दर्पण सह्याद्री न्यूज
जालना: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई व दैनिक मराठवाडा साथी’च्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजी नगर येथील हॉटेल वर्षा इन मध्ये नुकताच पार पडला.राज्याचे सहकारमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्या हस्ते प्रा. बाळासाहेब बोराडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र व प्रेरणादायी पुस्तके देऊन प्राध्यापक बोराडे यांना गौरविण्यात आले. 
यावेळी मंचावर राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी,मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा संपादक डॉ.प्रभू गोरे,व्यवस्थापकीय संपादक संजय व्यापारी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा.बाळासाहेब बोराडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, कृषी,साहित्य या विषयावर स्तंभलेखन करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक विषय हाताळले आहेत.त्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा.बाळासाहेब बोराडे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
