दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: येथून जवळ असलेल्या तपोवन येथील श्री आगस्थ ऋषी महाराज संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने भव्य महायज्ञ व अखंड हरीनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील 7 दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.महायज्ञ सोहळा समाप्ती कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी ना.दानवेंनी आगस्थ ऋषीं महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला त्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले व जमलेल्या भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या.यावेळी स्वतः ना.रावसाहेब दानवे यांनी भाविकांना वाढेकरी होऊन महाप्रसादाचे वितरण केले.
अखंड हरीनाम सप्ताह व महायज्ञ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेशरी पारायण,विष्णू पंचायतन यज्ञ,पितृयाग यज्ञ,रुद्र स्वाहाकार पूर्ण आहुती यज्ञ या वेळी पार पाडला.या प्रसंगी विविध कीर्तनकारांनी आपल्या कीर्तन सेवेतून सामाजिक समस्यांच्या संदर्भात भक्तांचे प्रबोधन केले.यावेळी अगस्थ ऋषी महाराज संस्थांचा परिसर भक्तिमय झाला होता.
केंद्रीय मंत्री ना.दानवेंनी समारोप प्रसंगी कार्यक्रमात सहभागी होऊन ग्रामस्थांसोबत महाप्रसादाचा आस्वाद घेतला.मंत्री ना.दानवें हे नेहमीच समाजमाध्यमात चर्चेत राहतात.याहीवेळी महाप्रसादाच्या पंगतीत ना.दानवेंनी स्वतः वाढेकरी होऊन पंगतीत वाढ फिरवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेशी त्यांची नाळ कायम असल्याचे म्हटले जात आहे.
या महायज्ञास प.पू.खडेश्वरी बाबाजी,मेस्टा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,अवचितराव कढवणे,प्रभू कढवणे,प्रदीप ताठे,राजेंद्र जगदाळे,खुशालराव मालुसरे,ओंकार कढवणे , रामेश्वर कढवणे, जनार्धन मालुसरे, सरपंच दत्ता जगदाळे, किशोर कढवणे, रामनाथ मालुसरे यासह भाविकभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
