दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
राजूर प्रतिनिधी: नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये बावणे पांगरी येथील ऋषी महाराज आदर्श विद्यालयातील १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.विजयी संघास मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी,जालना टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव अंबादास गीते,टेनिस क्रिकेट संघटनेचे सर्व सदस्य,संस्था अध्यक्ष सुभाष बोडखे, सचिव प्रवीण बोडखे,प्राचार्य जाधव, क्रीडा शिक्षक राठोड आदी जणांनी विजेत्या संघातील मुलींचे अभिनंदन केले आहे.
विजयी संघामध्ये साक्षी शिरसाठ (कर्णधार),पूजा मुटकुळे (उपकर्णधार), ऋतुजा चव्हाण,अंजली चिंचपुरे,आरती महाडिक,हर्षदा मोरे,स्नेहल हिवाळे,पायल हिवाळे,शुभांगी मुटकुळे,अंजली क्षीरसागर, प्रतिभा क्षीरसागर,धनश्री कदम या मुलींचा समावेश होता.यशस्वी मुलींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
