दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:येथे पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यामध्येअमोल जगताप यांची अकोला ग्रामीण पोलीस पदी तर प्रथमेश दाभाडे यांची जिल्हा पोलीस नांदेड येथे नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. वरील दोनही विद्यार्थी सामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी कठोर परिश्रमातुन हे यश संपादन केले आहे. हसनाबद पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार यांच्या हस्ते पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ढिगळखेडा येथील सरपंच सुदाम ढवळे,राजूरचे माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग,रुद्राणी फाऊंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा दारुवाले,राष्ट्रवादीचे दत्तु आण्णा पुंगळे, प्रसिद्ध व्यापारी विठ्ठलराव टेपले,शिवा संघटना जिल्हाध्यक्ष कैलासआप्पा गबाळे,पत्रकार राम पारवे,पोलीस कर्माचारी सरडे साहेब,देशमुख साहेब, भागिले साहेब,वाघ साहेब, ग्रामपंचायत सदस्य सिन्नाथ ढवळे,पुंजाराम दाभाडे,विनोद तायडे,गजानन दाभाडे, आनंद तायडे,गंभीर ढवळे, ज्ञानेश्वर मिसळ,नितीन दाभाडे, राहुल साळवे यासह अनेकजण उपस्थित होते.
