दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:
राजूर येथून जवळच असलेले मौजे चनेगांव येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळेस ग्रामस्थ तसेच मुंडे समर्थकांनी लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.गोपीनाथ मुंडे हे एक संघर्ष योद्धा होते.त्यांच्याकडे संघटन कौशल्य होते.त्यांनी सर्व समाज घटकातील बांधवांना सोबत घेऊन सामाजिक, राजकीय नेतृत्व केले. आजही सर्वांना त्यांच्याबद्दल आदर आहे. स्व. गोपीनाथ मुंडे हे जरी आपल्यात नसले तरीही त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व अमर आहे.अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,माजी सरपंच तसेच शेषराव जायभाये,सदाशिव घुगे, तंटामुक्ती अध्यक्ष पुंजाराम निहाळ,सामाजिक कार्यकर्ते जीवन घुगे,माधव जायभाये,प्रकाश जायभाये,परमेश्वर कायंदे,दीपक जायभाये ,कृष्णा घुगे,बळीराज घुगे, मदन सानप,पवन घुगे, रामा घुगे,ज्ञानेश्वर जायभाये,भगवान घुगे, बाळू घुगे, दत्ता घुगे,विठ्ठलराव घुगे यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आले.
