दर्पण सह्याद्री न्यूज
घनसांवगी :तालुक्यातील अंतरवाली राठी येथील प्रगतशील शेतकरी भाऊराव सांगळे यांचे वयाच्या 102 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाश्चात दोन मुले,तीन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सांगळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.भाऊराव सांगळे हे जुन्या पिढीतील एक सरळ मार्गी, निर्व्यसनी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे राहणीमान साधे होते परंतु विचार मात्र उच्च होते.आनंदी,निरोगी जीवन कसे जगावे हे त्यांना लाभलेल्या दीर्घायुष्यावरून लक्षात येते.त्यांच्या जाण्याने केवळ अंतरवालीच नव्हे तर संपूर्ण घनसावंगी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.नातेवाईक ,मित्र आणि सर्व समाज घटकातील बांधव,सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या वतीने भाऊराव सांगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
