दर्पण सह्याद्री न्यूज
राजूर प्रतिनिधी
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी येथील जगन्नाथ थोटे यांची निवड करण्यात आली आहे.वर्धा येथे सेवाग्राम सभागृहात झालेल्या संघटनेच्या वार्षिक बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष गणपतराव डोळसे, सचिव बाबुराव म्हमाने, कोशाध्यक्ष विजय गुप्ता शांताराम पाटील वर्धा जिल्हाध्यक्ष संजय देशमुख यांनी थोटे यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला.
संघटनेच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडी-अडचणी समस्या सोडवणे, संघटना मजबूत करणे तसेच पदाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवन्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असे नमूद आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल भीमाशंकर दारुवाले, सरांगधार बोडखे, कैलास गबाळे, साहेबराव पवार, अमोलराजे पवार यांच्यासह मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.
