दर्पण सह्याद्री न्यूज

लोकसहभागातून शाळेचा विकास;तडेगाव वाडी येथे जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन

भोकरदन तालुक्यातील तडेगाव वाडी येथील ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ व्हावी यासाठी लोकसहभागातून डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे शाळेचे रुपडे पालटण्यास मदत झाली आहे.या सामाजिक उपक्रमाबद्दल शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तडेगाव वाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.

भोकरदन पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर,शिक्षणविस्तार अधिकारी भिमराव बडगे,
गटसमन्वय एस.बी.नेव्हार,केंद्रप्रमुख सुभाष भुजंग,सरपंच राजूसिंग बमनावत,मुख्याध्यापक दीपक उगले आदी मान्यवरांच्या हस्ते डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबुलाल पांडे,सौ. सांडाबाई काकडवाल तसेच शिक्षणप्रेमी नागरिक दारासिंग जारवाल,गेब्ज फाउंडेशनचे राम काळे,विकास वाकडे, श्री. इंगळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

तडेगाव वाडी हे तेराशे लोकवस्ती असलेले एक छोटस गाव.या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहेत.पूर्वी भौतिक सुविधांचा शाळेत अभाव होता.परंतु ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लोकसहभागातून शाळेचे रुपडे पालटण्यास मदत झाली आहे.याही अगोदर ग्रामस्थांनी शाळेची रंगरंगोटी, ध्वजकट्टा,पिण्याच्या पाण्याची टाकी,नळ कनेक्शन, प्रथोमोपचार पेटी आदी साहित्य उपलब्ध करून दिलेआहे.

तडेगाववडी येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांच्या संकल्पनेतून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुसज्ज अशी वर्गखोली म्हणजेच डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आली आहे. यामध्ये दोन अँड्रॉइड टीव्ही संच,ट्रॉली स्पीकर लावण्यात आले आहेत.यावेळी गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर यांनी उद्घाटनपर भाषणात शाळेसाठी सुसज्ज अशी डिजिटल क्लासरूम  उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थ व शिक्षक यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान थेटे,प्रास्ताविक देठे, आभार प्रदर्शन काकडवाल यांनी केले.या कार्यक्रमास ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!