दर्पण सह्याद्री न्यूज

जालना: बतमीदारामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मंठा पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी गेवराई परिसरातील वीटभट्टीजवळ लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली.

या कारवाईत दीपक बन्सी आघाम, गोपाल सुरेश घोंडगे, अनिल शेळके, भगवान भास्कर रंधे,गजानन भीमराव गायकवाड,अंकुश जनार्धन रंधे,गुलाब आसाराम आव्हाड, धुराजी अर्जुन गायकवाड व शेख रशीद शेख हमीद, सर्व रा. वांजोळा, असे एकूण ०९ आरोपी मिळून आले.

कारवाईदरम्यान ०५ मोटारसायकली, ०७ मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ₹३,६७,४८०/-किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई मंठा पोलिसांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा. १३११ सुक्रे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!