दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर
हर घर तिरंगा अभियानांतर्गत चांदई ठोंबरे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायतने श्रीचे सेवेकरी महिला नंदाताई टेकाळे वअर्चनाताई गोफणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मागील अकरा वर्षापासून चांदई ठोंबरे येथील श्रीचे सेवेकरी बंधू-भगिनी श्रीक्षेत्र राजुरेश्वर मंदिर परिसरात निष्काम, निरपेक्ष सेवा देण्याचे काम करत आहेत.स्वच्छता अभियान, रक्तदान, अन्नदान ,फराळ वाटप सेवा,वृक्षारोपण यासारख्या विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.
त्यांच्या सेवा कार्याची दखल घेत सरपंच साहेबराव ठोंबरे व ग्रामपंचायत सदस्यांनी श्रीचे सेवेकरी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला.चांदई ठोंबरे येथील ग्रामपंचायतने महिलांना हा सन्मान दिल्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे आभार मानले. या कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
