दर्पण सह्याद्री न्यूज/ श्रीक्षेत्र राजुर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हरघर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे.त्यानिमित्ताने राजूर येथील
डायनामिक इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते प्रा. बाळासाहेब बोराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव गणेश खरात ,मुख्याध्यापक भास्कर पडोळ, दादाराव काकडे यांच्यासह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

त्यानंतर शाळेच्या प्रांगणातून राजूरच्या मुख्य रस्त्याने विद्यार्थ्यांची हरघर तिरंगा अभियान रॅली काढण्यात आली. यावेळी विविध पुरुषांची वेशभूषा साकारून विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय,वंदे मातरम, स्वतंत्र्य दिनाचा विजय असो, हरघर तिरंगा,अशा देशभक्तीपर घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर जालियनवाला बाग हत्याकांड या ऐतिहासिक नाटिका सादरीकरणातून शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या जीवनातील संघर्ष व देशभक्तीची आठवण करून दिली.नाटक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
