दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर
आषाढी एकादशी निमित्त राजूर येथील डायनामिक इंग्लिश स्कूल व खरात मामा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शाळा ते राजुरेश्वराच्या पायथ्यापर्यंत विद्यार्थ्यांची वारी काढण्यात आली होती. पर्यावरण संरक्षणाचा संदेश जावा म्हणून वृक्षदिंडीचेही आयोजन करण्यात आले होते.रथावर विराजमान झालेले विठ्ठल-रुख्मिणीं तसेच संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचा साकार केलेला सजीव देखावा कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

ज्ञानोबा-तुकाराम चा गजर आणि टाळ मृदुंगांच्या नादाने मंदिर परिसरात दुमदुमला होता.वारकरी वेशभूषा परिधान करून विद्यार्थी पावली खेळण्यात दंग झाले होते.तर मुलींनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून भक्तीगीतांवर नृत्याचे सादरीकरण केले.विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून पर्यावरण जतन करण्याचा संदेश दिला.तसेच पारंपरिक नृत्य, पावली, फुगडी यासारख्या कलाविष्काराचे सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. चिमुकल्यांच्या भक्तिमय नाद गर्जनेने आणि वारकरी वेशभूषेने राजुरनगरी पंढरीमय झाल्याचे दिसून आले.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून प्रतिसाद दिला.
याकार्यक्रमास गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुधाकर दानवे,संस्था अध्यक्ष बाबुराव मामा खरात,सरपंच भाऊसाहेब भुजंग, जिल्हा परिषद सदस्य कैलास पुंगळे,माजी उपसभापती गजानन नागवे,सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके, राजूर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,संस्थेचे सचिव गणेशभाऊ खरात, शाळा व्यवस्थापक विजय डोंगरे मुख्याध्यापक भास्कर पडोळ, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
