दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर:
राजुर येथील माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा आनठाई खर्च टाळत त्यातून श्रीक्षेत्र राजूर येथील श्रीराजुरेश्वर महागणपती मंदिरात सेवा देणाऱ्या महिला सेवेकरींना मंदिर परिसरात साफसफाई करण्यासाठी लागणाऱ्या सफाई साहित्याचे वाटप करण्यात आले.
खरंतर अभिष्टचिंतन सोहळा म्हटलं की सर्वांच्याच आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो.प्रत्येकजण आपापल्या परीने वाढदिवस साजरा करीत असतो.बऱ्याच वेळा आनंदाच्या भरात यादिवशी अनाठायी खर्चही होत असतो.परंतु राजूर येथील माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी मंदिर परिसरात सेवा देणाऱ्या महिला सेवेकरींना झाडू,खराटे यासारख्या सफाई साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल गणपती संस्थांच्या वतीने भुजंग यांचा शाल, श्रीफळ,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गणपती संस्थानचे कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे, विश्वस्त गणेश मामा साबळे, सरपंच प्रतिभा भुजंग, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते श्रीरामपंच पुंगळे,भगवानराव नागवे , ग्रामसेवक प्रमोद पुंगळे उपसरपंच संतोष मगरे,ग्रामपंचायत सदस्य विनोद डवले,निवृत्ती पुंगळे,मुसासाशेठ सौदागर, पंढरीनाथ करपे, परमेश्वर पुंगळे आप्पासाहेब पुंगळे,सतीश क्षीरसागर,उत्तम रावळक यांच्यासह श्रीच्या महिला सेविकाऱ्यांची उपस्थिती होती.
