दर्पण सह्याद्री न्यूज
भोकरदन: तालुक्यातील हसनाबाद येथील श्रीगणपती इंग्लिश स्कुलच्या ७८ विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले असून यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या परीक्षेमध्ये परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये अराध्या राहुल दरक,शिवाय सनी वनार्से,अमित सुदाम पारवे,आरुश निलेश कंगले,समर्थ विजय महाशब्दे,श्रुती विलास पुंगळे,आयुष दिनकर घोडे ,शौर्य विकास मिसाळ या विद्यार्थ्यांना पदके प्राप्त झाली आहेत.तर आयुष भाउसाहेब इंगळे,आरुषी विष्णु पवार,अथर्व स्वप्निल राठी ,मनस्वी महेश राठी,शिवराज जगन्नाथ पवार ,प्रांजल परमेश्वर पारवे, सत्यजीत राजु आहेर,यश विठ्ठल दानवे हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तिर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, व्यापारी,शिक्षकवृंद,सामाजिक कार्यकर्ते यांचेतर्फे अभिनंदन करण्यात आले.
