दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर
येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावीत शिकणारी आरोही पांडुरंग इंगळे हिने महादीप परीक्षेमध्ये भोकरदन तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून त्यामुळे तिची अवकाश संशोधन केंद्र श्रीहरिकोटा येथे अभ्यास सहलीसाठी निवड झाली आहे. भोकरदन तालुक्यातून 40 विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये राजूरच्या आरोही इंगळे हिचा समावेश आहे.शालेय जीवनात विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली.
तिच्या या यशाबद्दल भोकरदनचे गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर,विस्तार अधिकारी श्री बडगे,डॉ.प्रफुल्लता भिंगोले, केंद्रप्रमुख रमेश पुंगळे, भीमाशंकर दारुवाले, पांडुरंग इंगळे, शितल दारूवाले,सुनीता मगरे,संतोष पूंगळे, मिलिंद मगरे,सुरेश जाधव,लक्ष्मण पुंगळे,योगेश पुंगळे, रामेश्वर सोनवणे, माया पवार,स्वाती माठे,शितल पिंगळे, आस्मा शहा,सपना कांबळे आदींनी अभिनंदन केले.
