दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर :आजमितीला स्पर्धेच्या युगात शासकीय नोकरी मिळणे अत्यंत कठीण काम झाले आहे.सतत प्रयत्न करूनही अनेकवेळा पदरी निराश येते.परंतु काहीजण मात्र अपयशाने खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे गरुड भरारी घेऊन यशाला गवसणी घालतात.भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथील शेतकऱ्यांच्या पोरांनी स्पर्धा परीक्षेमध्ये झेंडा रोवला आहे.
गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या तब्बल 22 विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत विविध पदावर निवड झाली आहे.एकीकडे पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकडे दिसत असला तरी दुसरीकडे मात्र चांदई एक्को येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांनी यशाचा डंका पिटवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समिती तसेच ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की सन 2024 मध्ये शासनाच्या वतीने विविध पदांकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. चांदई एक्को येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले 22 विद्यार्थी शासनाच्या विविध विभागात शासकीय सेवेत दाखल झाले असून शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मनीषा मोरे (वर्धा पोलीस), प्रियंका मोरे(ठाणे वनरक्षक),वनिता गवळी (लातूर पोलीस), कविता टोम्पे (संभाजीनगर पोलीस),विद्या ढाकणे ( वैद्यकीय अधिकारी), रवी ढाकणे (बुलढाणा पोलीस), सचिन ढाकणे (नागपूर पोलीस), कृष्णा पवार (जालना पोलीस),संतोष बोबडे (जालना पोलीस), भरत पवार (छत्रपती संभाजीनगर पोलीस), ज्ञानेश्वर मोरे (SRPF नागपूर),प्रवीण गंगावणे (शिक्षक जालना) येथे निवड झाली आहे.
तसेच सोमीनाथ ढाकणे (BSF भारत सरकार),ज्ञानेश्वर ढाकणे (प्राध्यापक), एकनाथ ढाकणे (नागपूर पोलीस), गोविंद ढाकणे (Indian Army), महेश पवार (Indian Army), गणेश ढाकणे (एसटी महामंडळ), गजानन मोरे (महसूल विभाग), ब्रम्हा ढाकणे (महसूल विभाग),माणिक गवळी (शिक्षक जालना), पल्लवी ढाकणे (Flipkart Company), प्रमोद तळेकर (एमबीबीएस)साठी निवड झाली आहे.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेली या शाळेची विद्यार्थिनी गायत्री ढाकणे सह एकूण 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून त्यांचा सुद्धा जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
याकार्यक्रमासाठी सरपंच अनिता तळेकर ,उपसरपंच विष्णू मोरे ,पोलीस पाटील दादाराव पवार, माजी पंचायत समिती सदस्य जगनराव पवार ,माजी सरपंच रामदास तळेकर, अण्णा शेठ ढाकणे,शालेय समिती अध्यक्ष भास्कर पवार, उपाध्यक्ष ज्योती गंगावणे,बाबासाहेब ढाकणे,भगवानढाकणे नारायण पवार,राजू तळेकर,कैलास गंगावणे ,बबन बनकर, कैलास ढाकणे,नानासाहेब बेडके,सुदाम तळेकर, मेहबूब शेख,रामेश्वर तळेकर, सखाहारी पवार ,समाधान तळेकर, केंद्रप्रमुख आणा इंगळे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे भोकरदनचे गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर, केंद्रप्रमुख आणा इंगळे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पी. पी.पालोदे, व्ही.बी साळवे ,भरत थोरात,भगवान लहाने गजानन लहाने, अनिल वरकड,महानंदा डोके,कल्पना जगताप यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अनिल वरकड यांनी तर आभार प्रदर्शन भरत थोरात यांनी केले .
