दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
राजूर: येथील मोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला असून तब्बल बावीस वर्षांनंतर जुन्या वर्गमित्रांनी एकत्र येऊन शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.यावेळी आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसरात वृक्षारोपण केले.शिक्षक व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
राजूर येथील मोरेश्वर विद्यालयाच्या 2002 ते 2004 या शैक्षणिक वर्षातील दहावी,बारावीचे विद्यार्थी व्हाट्सएप समूहाच्या माध्यमातून एकत्र आली.व जुन्या वर्गमित्रांना भेटण्यासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले.16 जून रोजी राजूर येथे गणपती मंदिर परिसरातील सभागृहात शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण झाले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजुरेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी मंचावर शिक्षक संतोष इंगळे,प्रदीप मोहिते,तातेराव अंभोरे,दिपचंद अग्रवाल सोपान जावळे , सलीम शेख आदीजन उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुजनांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांस मोलाचे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.या कार्यक्रमात शिक्षक व वर्गमित्रांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निर्मला पुंगळे, लता साबळे, मंजूर शेख सौदागर,ॲड.संदीप दारुवाले, सोमीनाथ सोनवणे, दीपक सोनवणे, सुभाष भिडे,नारायण पुंगळे यांच्यासह सर्व वर्गमित्रांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.संदिप दारुवाले यांनी केले तर आभार गजानन जोशी यांनी मानले.
