दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
भोकरदन: मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत भोकरदन तालुक्यातील धावडा येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 100% लागला असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखली.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रियंका प्रल्हाद सोनवणे (93.40 %) प्रथम, अर्चना हरिदास देवकर (93.20 %) द्वितीय, योगेश गणेश लक्कस (93.00 %) तृतीय क्रमांक मिळवला आहे. विद्यालयाचे 99 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह प्रविण्यासह उत्तीर्ण झाले असून आठ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे,सचिव निर्मलाताई दानवे,मार्गदर्शक आमदार श्री.संतोष पाटील दानवे साहेब यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
तसेच आश्रमशाळा मुख्याध्यापक कौतिक खडके, प्राचार्य किरण सपकाळ, माध्यमिक मुख्याध्यापक सुनील डोंगरे, अधीक्षक संजय गायके, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर सुरडकर तसेच विद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
