दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल मंगळवारी रोजी जाहीर झाला आहे.या परीक्षेत राजूर येथील तन्वी सुधाकरराव दानवे हिने 88.33 % गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.त्याबद्दल तिचा जालना मार्केट कमिटी उपसभापती तथा भाजपा उपजिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी गव्हर्नमेंट काँट्रॅकटर सुधाकरराव दानवे,शुशीलाताई दानवे ,योगीताताई दानवे, प्रतिकभैया दानवे आदीजन उपस्थित होते.

तन्वी दानवे ही श्रीगणपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असून तिने या परीक्षेत 88.33% गुण मिळवून महाविद्यालयातून दुसरा येण्याचाही मान मिळविला आहे.भविष्यात कोणते क्षेत्र निवडणार असे विचारले असता वैद्यकीय क्षेत्राकडे जाण्याचा कल असल्याचे तनवी दानवे हिने सांगितले.परीक्षेतील या यशाबद्दल तन्वी दानवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
