दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत राजूर येथील साक्षी रामेश्वर टोम्पे हिने 78.50% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.साक्षी टोम्पे ही राजूर येथील मोरेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असून तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीने अभ्यास करून बारावीच्या परीक्षेत 78.50% गुण मिळवीत कौतुकास्पद यश संपादन केले आहे. साक्षीने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
