दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: येथे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये प्रथम दिवसाचे कीर्तन रुपी सेवा हभप जगन्नाथ महाराज पाटील महाराज यांची झाली .एकादशीच्या पर्वकाळावरती निवृत्तीनाथाचे महत्त्व सांगताना धन्य धन्य निवृत्ती राया |काय महिमा वर्णना|| या अभंगावरती महाराजांनी वेगवेगळे प्रमाणे देऊन भगवंतांची थोरवी वर्णिली.
पुढे उपदेश करतांना पाटील महाराज म्हणाले की गोड असं संत चरित्र जीवनामध्ये नेहमीच गायन करावं संतांच्या चरित्राने भगवंताला आनंद वाटतो म्हणून आज गणेशाची चैतन्य मूर्ती या ठिकाणी गणरायाचं वेगवेगळ्या अंगाने वर्णन करून गणराया सर्वांना बुद्धी देणार आहे आणि त्या बुद्धीच्या जोरावरती फार मोठा उच्चांक गाठता येतो जीवनामध्ये सत् सत् विवेक बुद्धीने परमार्थ करावा आणि निश्चितच वारकरी संप्रदाय एवढा महान आहे की याचा संदेश यांचा अंगीकार यांचा आचरण पाश्चिमात्य देशातील लोकांनी करावं असा मोलाचा संदेश महाराजांनी दिला.
तरूणानी पर्माथ करावा उद्योग करावा असे प्रतिपादन पाटील महाराजांनी केले उपस्थित सुदाम महाराज निर्मळ गोरक्षनाथ महाराज सोनवणे गायनाचार्य भगवान महाराज गाडेकर तुळशीराम महाराज दाभाडे दादा महाराज पाटील काका महाराज खैरे प्रदीप महाराज बनकर मृदंगाचार्य उमेश मराठा ठोंबरे मयूर महाराज मोहिते शिवाजी महाराज शेवाळे गणेश महाराज देठे कदम महाराज शेजुळ महाराज सोमनाथ आबा हिवाळे संयोजक विष्णू महाराज सास्ते गावकरी मंडळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
