दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर: येथून  जवळच असलेल्या साखरवाडी येथील ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून व्यसनमुक्तीची शपथ घेतली.बिडी, तंबाखू,सिगारेट, दारू व इतर जीवघेणी व कुटुंब उध्वस्त करणारे पदार्थ सेवन करणारं नाहीत असा निर्धार केला.  साखरवाडी येथे ध्वजारोहण निमित्त ग्रामस्थ एकत्र जमले होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते, नृत्य, पोवाडे, भारूडे सादर करून वाहवा मिळवली. नाटकाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.यावेळी माजी सरपंच सुरेश औताडे, माजी उपसरपंच शिवाजी औताडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू सावंत, मुख्याध्यापक शिवाजी लेंडे, राजेश्वर नाईक, संदीप होळे, शशिकांत बाम्हणे,श्रीमती कुशीवर्ता औताडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.यावेळी ग्रामस्थांनी आपला गाव व्यसनमुक्त करण्याची शपथ घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!