दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर:येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 30 वा नामविस्तार दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी नगर येथील मराठवाडा विद्यापीठाचा 14 जानेवारी 1994 रोजी नामविस्तार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव विद्यापीठास देण्यात आले होते. तेव्हापासून 14 जानेवारी हा दिवस नाविस्तार दिन म्हणून साजरा केला जातो. लढ्यात शहीद झालेले हुतात्म्यांना राजूर येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक गुलाबराव मगरे, सरपंच भाऊसाहेब भुजंग,ग्रामविकास अधिकारी प्रमोद पुंगळे,जिल्हा परिषद सदस्य कैलास पुंगळे, प्रा. तातेराव अंभोरे, संतोष मगरे, मुख्याध्यापक रमेश राऊत, सोपान जावळे, माजी सभापती भाऊसाहेब काकडे, संदिप साळवे, गंगाधर आदमाने , उपसरपंच जिजाबाई मगरे, अशोक मगरे,अमोल साबळे, मनोज जाधव,दादाराव मगरे, दिगंबर मगरे, संभाजी बोर्डे,संजय साबळे ,संदीप पवार, नामदेव बनसोडे,गौतम रगडे, पद्माकर चंदनशिवे, श्याम नावकर ,भगवान रगडे, कैलास वाकेकर, विशाल खरात, रवि परकरे, सुदाकर खरात, आरोग्य कर्मचारी दगडू रगडे, दिपक दाभाडे ,अण्णा साबळे ,गजानन आठवले, प्रदिप गंगावणे ,भगवान नावकर , दिपक सोनवणे ,भिमराव मगरे, मिलिद मगरे ,कृष्णा मगरे ,संगीता मगरे, मंडाबाई सोनवणे, सविता मगरे ,साखराबाई दाभाडे, ताईबाई मगरे ,यशोदा जाधव ,मिताली जाधव, रंजना दाभाडे, कमलबाई मगरे, शोभाबाई साबळे, साळूबाई मगरे, आशा दाभाडे, रंजना मगरे ,मिना मगरे यांसह अनेकजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन इंगळे यांनी केले तर सोपान जावळे यांनी उपस्थिताचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!