दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: येथून जवळ असलेल्या चनेगाव येथील विशाल घुगे व राजूर येथील देशोन्नतीचे प्रतिनिधी दीपक घुगे यांनी अनाठायी खर्चाला फाटा देत समाजभिमुख उपक्रमातुन आपले वडील कै. संजय नारायण घुगे यांच्या 15 व्या समूर्तीप्रित्यर्थ चांदई एक्को केंद्रातील सिद्धार्थनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मेस्टाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे मार्गदर्शक प्रा. बाळासाहेब बोराडे,केंद्रप्रमुख अण्णा इंगळे,विजय पिंपळसे, पत्रकार दीपक घुगे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सामाजिक भान जोपासत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप केल्याबद्दल केंद्रप्रमुख अण्णा इंगळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.तर वडील वरवरती कठोर वाटत असले तरी आतून मात्र कोमल असतात वडिलांनी केलेल्या संस्काराच्या जोरावरच आपण आयुष्यात यशस्वी होत असतो असे मत प्रा. बाळासाहेब बोराडे यांनी व्यक्त केले. तर दीपक घुगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वडिलांच्या आशीर्वादाने समाजामध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्याचे मत अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर पुंगळे यांनी व्यक्त केले.यावेळी भीमराव सदाशिवे यांनी कै.संजय घुगे यांच्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य व मिठाई वाटण्यात आले.
यावेळी गणपतदादा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, प्रा.बाळासाहेब बोराडे ,केंद्रप्रमुख आण्णा इंगळे,केंद्रीय मुख्याध्यापक पालोदे सर, विजय पिंपळसे ,मुख्याध्यापक सतीश आंबरे,अनिल वरकड ,भगवान सदाशिवे,भीमराव सदाशिवे,अरुण जावळे,शाळेचे मुख्याध्यापक आर.एच. दानवे शिक्षिका श्रीमती डी.एस.चिटकलवर यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पिंपळसे, सूत्रसंचालन सतीश आंबरे तर आभार अनिल वरकड यांनी मानले.
