दर्पण सह्याद्री न्यूज:
प्रा.बाळासाहेब बोराडे
जालना: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात अनेक जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविल्या.सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी मोदी सरकारने आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, मातृवंदना योजना,आरोग्य वर्धिनी केंद्र यासारख्या योजना राबवून गरिबांचे आयुष्यमान उंचावण्याचा प्रयत्न केला. राजनीतीपेक्षा त्यांनी राष्ट्रनितीला अधिक महत्त्व दिले.म्हणून येणाऱ्या काळात मोदी सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहिती घराघरात पोहचविणारअसल्याचे प्रतिपादन भाजपा वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक डाॅ. बाळासाहेब हरपळे यांनी केले.
नुकतीच जालना येथे नमो डाॅक्टर्स क्लस्टरची विभागीय बैठक संपन्न झाली.त्यावेळी डॉ. हरपळे यांनी भाजपा वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.केंद्र सरकारच्या विविध योजना रुग्णमित्राच्या माध्यमातून गावपातळीवर नेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार प्रत्येक घरात नेण्यासाठी भाजपा वैद्यकिय आघाडी प्रयत्न करेल असेही डॉ. हरपळे म्हणाले.
यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे मुख्य प्रदेश प्रवक्ते डाॅ. स्वप्नील मंत्री,भाजपा महिला वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश प्रभारी डाॅ. उज्वला हाके, महिला प्रदेश संयोजिका डॉ. चंचल साबळे,प्रदेश सहसंयोजक पॅरामेडिकल विंग प्रज्ञा हातनालिकर,प्रदेश सहसंयोजक डाॅ.संदीप चोपडे पाटील, जालना वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक डाॅ.श्रीमंत मिसाळ ,डॉ कैलाश सचदेव, होमिओपॅथी विभागाचे प्रदेश सहसंयोजक डॉ.राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकपर भाषणात डॉ.स्वप्नील मंत्री यांनी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडेंच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.भाजपा वैद्यकिय आघाडीतर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडी महिला प्रदेश विंग प्रदेश संयोजक डॉ चंचल साबळे ,डॉ.उज्वला हाके यांनी वैद्यकिय आघाडीत महिलांचा सहभाग आणि महिला डॉक्टरांच्या समस्या ह्यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
होमिओपॅथी विभाग प्रदेश संयोजक डॉ.भालचंद्र ठाकरे यांच्या निर्देशानुसार जालना जिल्हा होमिओपॅथी विंग
पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.डॉ.चोपडे यांनी जालना वैद्यकिय टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या बैठकीस डॉ.विनायक काकड , डॉ गोविंद भताने, डॉ खेडेकर, डॉ ईश्वर जटाळे, डॉ अमोल गिराम, डॉ विजय सेनानी, डॉ करवा, डॉ केदार कुलकर्णी, डॉ राजकर, डॉ सुसर पाटील, डॉ.दाभेराव तसेच जालना जिल्हा भाजपा वैद्यकिय आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
