दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
धुळे:म्हसदी येथील अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील उपक्रमशील शिक्षक दीपक दौलतराव देवरे यांनी मराठी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे.त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर,मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून दीपक देवरे यांचे अभिनंदन होत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे २६ मार्च २०२३ रोजी सेट पात्रता परीक्षा घेण्यात आली होती.नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.परीक्षेत दीपक देवरे हे पात्र ठरले आहेत.वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.या परीक्षेत दीपक देवरे यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल अनुदानित आश्रम शाळेचे संस्थापक- अध्यक्ष तथा म्हसदी गावचे उपसरपंच चंद्रकांत पंडितराव देवरे,संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे,तहसीलदार नितीन कुमार देवरे,मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, म्हसदी येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम.एच.देवरे, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती आणि मित्रपरिवार यांच्या वतीने दीपक देवरे यांचे अभिनंदन करण्यात आले.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
