दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:येथील दर्शन महेश देशमुख या विद्यार्थ्याने नवोदय परीक्षेत विशेष प्राविण्यासह गुण संपादन करून घवघवीत यश मिळवून नवोदय विद्यालयाच्या पुढील शिक्षणासाठी पात्र ठरला आहे. त्यानिमित्त राजुरी येथील मित्र परिवाराच्या वतीने दर्शन देशमुख याचा शाल,श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा शोध घेऊ त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून उच्च दर्जाचे शिक्षण देणे हा नवोदय परीक्षेचा मुख्य उद्देश आहे.या परीक्षेबाबत आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात जागृती झाल्याने जिल्हा भरातून हजारो विद्यार्थी परीक्षेत बसत असतात.
दर्शन देशमुख ने या परीक्षेत ९७.५० टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे.परतुर तालुक्यातील आंबा येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी पासून पुढील शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरला आहे. त्याबद्दल राजुर येथील मित्र परिवाराच्या वतीने दर्शन देशमुख याचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रा.बाळासाहेब बोराडे ,व्यापारी संघाचे कोषाध्यक्ष भीमाशंकर दारूवाले,नंदुभाऊ ढवळे, डॉ.ईश्वर जटाळे ,श्री पोटे,श्री थोटे, हरिदास निकम,आर.एच.दानवे,विनोद पांडे, विष्णू गवळी, गजानन लहाने,महेश देशमुख आदीजन उपस्थित होते. दर्शन देशमुख याने नवोदय परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
