दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:बदनापूर तालुक्यातील व राजूर पासून जवळ असलेल्या आसरखेडा येथील ऋषी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी,बारावी आणि नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना करियर संदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले.
सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी संस्था अध्यक्ष सुभाष बोडके,उपाध्यक्ष सारंगधर बोडखे,सामाजिक कार्यकर्ते प्रा.बाळासाहेब बोराडे,पत्रकार फिरोज शेख, प्राचार्य अमोल बोडखे,कृष्णा जाधव,सरपंच, उपसरपंच, शालेय समितीचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी,बारावी आणि नीट परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या परीक्षेत ऋषी महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह गुण मिळवून याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
दहावीच्या परीक्षेत संचिता हिवाळे प्रथम,पवन बोडके द्वितीय तर समीक्षा बोडखे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. इतर विद्यार्थ्यांनीही ८०% टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन केले आहे. तर बारावीच्या परीक्षेत निकिता डोके प्रथम,दीपक बोडके द्वितीय तर ज्ञानेश्वर हिवाळे याने तृतीय क्रमांक पटकावून विशेष प्राविण्यास गुण संपादन केले.
वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची मानली जाणाऱ्या नीट परीक्षेतही ऋषी महाराज महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.यामध्ये सुरेश बनसोडे,धनराज बोडखे,निवृत्ती काकडे या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.सुरेश बनसोडे या विद्यार्थ्यांने अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत नीटमध्ये यश मिळवल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.बोराडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात दहावी बारावीनंतर पुढे काय या विषयावर मार्गदर्शन केले.तर विद्यार्थ्यांनी अपयश आल्यानंतर खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहावे म्हणजे यश हमखास मिळते असे संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोडखे यांनी म्हटले.

कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक नारायण बोडके, यादव डोके,एकनाथ हिवाळे,उत्तम हिवाळे,माधव बोडखे, कैलास हिवाळे,गणेश बोडके,ज्ञानेश्वर हिवाळे,कैलास हिवाळे तसेच माता पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य एन. के.काटकर, शिक्षक एल.एस.राजहंस,जी.एल.झिने,व्ही. एस.राऊत यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य अमोल बोडके,सूत्रसंचालन जी.एल.झिने तर आभार प्रदर्शन एल.एस.राजहंस यांनी केले.
