दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:श्री शिवेश्वर महादेव यांच्या कृपाशीर्वादाने व संत सिद्धांत आध्यत्मिक वारकरी भजनी मंडळ बोरगाव (बु), बोरगाव मठ व बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने नाथषष्टी निमित्त आयोजित श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडीचे राजूरमध्ये आगमन होताच दिंडीतील सहभागी वारकरी व भजनी मंडळींचे राजूर ग्रामस्थांच्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

या दिंडी प्रमुख ह.भ.प.माऊली मार्तंड महाराज व विणेकरी पांडुरंग महाराज जोशी तसेच भोकरदन-जाफ्राबाद तालुक्यातील वारकरी व भजनी मंडळी सहभागी झालेली आहे.या पायी दिंडीचे 6 मार्च रोजी बोरगाव येथून प्रस्थान झाले असून ती 15 मार्च रोजी नाथषष्ठीच्या दिवशी संत एकनाथ महाराज संतपीठ नाथसागर पैठण येथे काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.
पायी दिंडीचे राजूर येथे आगमन होताच दिंडी प्रमुख ह भ प माऊली मार्तंड महाराज विणेकरी पांडुरंग महाराज जोशी व इतर वारकरी व भजनी मंडळीचे टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.त्यानंतर आरती घेण्यात आली.वारकऱ्यांसाठी भाऊसाहेब नागवे यांनी चहाची तर शंकर गुळवे,विष्णू महाराज,नरसिंग घुगे यांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती. राजुरी येथील व्यापारी शंकर गुळवे यांनी पालखीसाठी ट्रॅक्टरही उपलब्ध करून दिला.फराळ व चहा-पाणी झाल्यानंतर दिंडीने पैठणकडे प्रस्थान केले
राजूर येथे दिंडीच्या स्वागतासाठी सुधाकर दानवे,गजानन नागवे,माऊली पुंगळे,शंकर गुळवे,बालुशेठ काबरा, रामेश्वर सावंत,विष्णु महाराज पुंगळे,नारायण डकले,राजू गुळवे, अरविंद देशमुख,दत्ता गिरी,पंकज पिंपळे,भगवान पुंगळे, आप्पासाहेब पिंपळे,संचित पुंगळे,अंकुश सोनवणे, कृष्णा सोनवणे,कृष्णा खांडेभराड,उमेश पुंगळे यासह अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
