दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:वातावरणातील बदल,पावसाची रिपरिप,हवेत गारवा,आणि तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला साद घालत भोकरदन तालुक्यातील राजुर येथे होळी व रंगपंचमी मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली. मागील दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे होळी आणि धुलीवंदनवर सरकारने अनेक निर्बंध लादले होते त्यामुळे नागरिकांना रंगपंचमी साजरी करता आली नव्हती.यावर्षी मात्र राजुर येथे होळी आणि रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी पारंपरिक पद्धतीने ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली होती. यामध्ये सामील होऊन समाज बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.राजुर करांनी रंगाची उधळण करत मोठ्या उत्साहात धुळवड साजरी केली.

या रंगपंचमीला पाण्याचा अपव्यय टाळू नागरिकांनी कोरड्या व नैसर्गिकरित्या बनवलेल्या रंगाचा वापर केला. सकाळपासूनच गावातील तरुण घडाघटने बाहेर पडून आपल्या मित्रांना रंग लावत धुलीवंदनाच्या शुभेच्छा देत होते.धुलीवंदनांचा सण महिला आणि बच्चे कंपनीने सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात साजरा केला.
