दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर- वारकरी संप्रदाय हा एक आकाशाच्या उंचीचा संप्रदाय आहे.संतांची शिकवण मानवतावादी आहे.महाराष्ट्र ही संतांची भूमी असली तरी आज हाच महाराष्ट्रात व्यसनाधीनतेने ग्रासला आहे.व्यसनाधीनतेमुळे हजारो लोकांचे संसार मोडकळीस आले आहेत. व्यसनाधीनतेमुळे जीवन उद्धवस्त होते.म्हणून तरुणांनी व्यसन करण्याआधी आपल्या कुटूंबाचा विचार करावा असे प्रतिपादन शिवचरित्रकार ह.भ.प.बाळासाहेब महाराज शिंदे यांनी व्यक्त केले.भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव (सुतार) येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन सेवेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ह.भ.प.शिंदे महाराज म्हणाले की संतांच्या शिकवणीतून संत,ग्रंथ आणि भगवंताची जाणीव होते.
भक्ती मार्गातून जीवन समृद्ध होते.अध्यात्मिक संस्कारातून एक राष्ट्रभक्त आणिआदर्श युवक निर्माण होतो. म्हणून देशातील तरुणांनीव्यसन करून आपलं जीवन उध्वस्त करू नये.व्यसन करण्याअगोदर आपल्या परिवाराचा विचार करावा.युवकांनी राष्ट्र आणि समाज कार्यासाठी जीवन खर्ची करावे असेही ह.भ.प.बाळासाहेब शिंदे महाराज म्हणाले.
पुढे बोलताना ह.भ.प. शिंदे महाराज म्हणाले की,प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची सेवा करावी.गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालावी.नियमित आळंदी, पंढरपूरची वारी करावी,त्यामुळे यातून मनाला आत्मिक समाधान मिळते.
तरुणांनी आपले जीवन देव, देश, आणि धर्म कार्यासाठी समर्पित करावे असेही असेही ह.भ.प.बाळासाहेब शिंदे महाराज म्हणाले.या कीर्तन सेवेला सरपंच, उपसरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, शिक्षकवृंद आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
