दर्पण सहयाद्री न्यूज
लातूर येथील प्रा.ज्योती दिनकर भोसले यांना श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठ राजस्थान यांच्यावतीने ओरिसा राज्याचे राज्यपाल प्रोफेसर श्री गणेशलाल,श्री जे.जे.टी.विश्वविद्यालयाचे चेअरपर्सन डॉ.विनोद टीबडेवाला यांच्या हस्ते नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली.
प्रा.ज्योती भोसले यांनी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विद्याशाखेतून ‘आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ राइस प्लॅन्ट डीसीज युझिंग मशीन लर्निंग’या विषयात संशोधन केले.त्यांनी डॉ.संतोष शिवाजीराव लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधनकार्य पूर्ण केले.
प्रा.ज्योती भोसले यांना पीएच.डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी प्रा.ज्योती भोसले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
