दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वच्छ भारत मिशन अभियानाचा प्रचार,प्रसार व्हावा, स्वच्छता मोहीम ही एक व्यापक चळवळ निर्माण होऊन शालेय जीवनापासून बाल मनावर स्वच्छतेचे संस्कार व्हावे या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन सामान्य ज्ञान स्पर्धेत राजूर येथील प्रांजल बाळासाहेब बोराडे हिने द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे,आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने जिल्हा परिषद शिक्षण विभाग,श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान आणि ड्रीमलँड शिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध गटातील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ भारत मिशन सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये प्रांजल बोराडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल ड्रीमलँड संस्थेच्या अध्यक्षा संध्या गायकवाड, प्राचार्य प्रीती देशमुख,उपप्राचार्य स्नेहा सबनीस यांच्या हस्ते प्रांजल बोराडे हिस बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तिच्या या यशाबद्दल प्रांजल बोराडे हीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
