दर्पण सह्याद्री न्यूज
लोणगाव येथून जवळच असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घायाळवाडी येथील इयत्ता सातवीत शिकणारी विध्यार्थीनी कुमारी पूजा गणेश घायाळ हिने शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी तिने ही परीक्षा दिली होती परंतु कोविडमुळे या परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला होता. आता मात्र नुकताच शालेय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत पूजाने कुठल्याही खाजगी शिकवणी शिवाय तिने हे यश मिळवले आहे. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अभ्यासाविषयी तिच्या मनातील प्रेरणा या दोन गोष्टींमुळे तिला हे यश मिळाले आहे.

अगदी सामान्य कुटूंबातील पूजाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवल्या बद्दल लोणगाव येथील ग्रामपंचायत आणि जि. प.प्राथमिक शाळा यांच्या वतीने पुजाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सरपंच राजू खरात,उपसरपंच पांडू साखरे,ग्राम पंचायत सदस्य राहुल काकडे, विनायक झिने,जुमन शहा,
बळीराम कोरडे,विष्णू बरोकर,आत्माराम मामा राजळे, उद्धव घायाळ,संतोष सावंत,संतोष झिने,कडुबा राजळे,
शिवाजी घायाळ शाळेतील मुखध्यापक-भगवान घायाळ, शिक्षक गणेश घुगे यासह ग्रामस्थांनी पूजाचे कौतुक केले आहे.
