दर्पण सह्याद्री न्यूज
पूर्णा: येथील पंकज ओंकारसिंह बैसठाकूर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ.उद्धव भोसले,प्रभारी कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली.

पंकज बैसठाकूर हे सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) या विषयाचे संशोधक विद्यार्थी आहेत.त्यांनी डॉ.टी.ए.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रोडक्शन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ सेकंडरी मेटाबोलइट्स फ्रॉम स्ट्रेप्टोमायसिस स्पेसिस असोसिएटेड विथ रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स’या विषयात आपले संशोधन कार्य पूर्ण केले.

त्यांच्या या संशोधन कार्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले,प्रभारी कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, बाह्य परीक्षक डॉ.गुरुविंदरसिंह कोचर,डॉ.देवींदर कौर, शिवसेना(ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विशाल कदम,संतोष एकलारे,एस.जे.पांचाळ,त्र्यंबक पांचाळ,अरुण डुब्बेवार,प्रा. एस.पी.चव्हाण,डॉ.एच.जे.भोसले,डॉ.एल.एच.कांबळे,अभिषेक ठाकूर,डॉ.आर.डी.बरडे,बाळासाहेब कुुलकर्णी, बी.डी.लाड,एस.सी.चव्हाण,डी.जी.पुरी,एम.एस.जाधव,बिंदासिंह ठाकूर,आदीजणांनी पंकज बैसठाकूर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
