दर्पण सह्याद्री न्यूज
‘मत्सोदरी’त गुणवंताचा सत्कार; राजूर येथील अंजली पुंगळे अभियांत्रिकी परीक्षेत प्रथम
प्रा.बाळासाहेब बोराडे
जालना-मूळची राजूर येथील परंतु जालना येथे मत्सोदरी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली कु.अंजली दत्तात्रय पुंगळे या विद्यार्थिनीने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.त्याबद्दल माजी आरोग्यमंत्री आ.राजेश टोपे यांनी तिचे कौतुक केले असून सौ.मनीषाताई टोपे व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय औरंगाबाद विभागाचे माजी सहसंचालक डॉ.महेश शिवणकर यांच्या हस्ते कु.अंजली पुंगळे हिस प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

नुकताच जालना येथे मत्सोदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात पालक मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी मत्सोदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बी.आर.गायकवाड, प्राचार्य डॉ. एस.के.बिरासदार, उपप्राचार्य प्रा.रवींद्र करवंदे, विभाग प्रमुख डॉ. डी.एम.सोळंके,डॉ.सुजाता पाटील,प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, पालक,विद्यार्थी उपस्थित होते.

अंजली पुंगळे हिच्या यशाबद्दल बाबुराव मामा खरात, आबाराव मामा खरात,सांडू अण्णा पुंगळे, कैलास पाटील पुंगळे ,श्रीराम पंच, शिवाजी अण्णा पुंगळे, भिकन डवले, भगवान पुंगळे,मुसा शेठ सौदागर,अरविंदराव थोटे,दत्तात्र्य पुंगळे,आर.आर.पाटील,नामदेव पुंगळे यासह अनेकांनी कौतुक केले.
