दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर:येथे गणपत दादा इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थी, शिक्षक,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी जय भवानी जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनचुंबी घोषणा दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिक जिजाऊ वंदनाचे गायन केले.

या प्रसंगी गणपत दादा इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका व विद्यार्थिनींनी माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेची भव्य अशी रांगोळी काढून त्या माध्यमातून महापुरुषांना मानवंदना देण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांनी भाषणातून राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टदार सुधाकरराव दानवे,हसनाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके, गणपत दादा संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,शिवाजीराव पुंगळे,
अंकुश नागवे, भाऊसाहेब काकडे, विनायक पुंगळे
भगवानराव नागवे,गणेश पुंगळे,प्रा.बाळासाहेब बोराडे,राम पारवे,भीमाशंकर दारुवाले,नामदेव पुंगळे,साहेबराव पवार,
निवृत्ती पुंगळे,सुखानंद पारवे, रवींद्र पुंगळे,सुनील पुंगळे,
विनोद पुंगळे, बबन मगरे,उमेश पुंगळे,आकाश पुंगळे, नारायण दानवे,अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,मुख्याध्यापिका श्रीमती आशाताई पुंगळे,पालक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माँसाहेब जिजाऊंच्या विचारातून जगण्यास प्रेरणा मिळते-ज्ञानेश्वर पुंगळे (मेस्टा जिल्हा अध्यक्ष)

जिजाऊंच्या विचारांची शिदोरी कायम सोबत आहे.त्यांच्या प्रेरणादायी विचारांतुन जगण्यास स्फूर्ती मिळते समाजात काहीतरी वेगळं करण्याची धडपड सुरू असते. माँसाहेब जिजाऊंचे विचार हे प्रत्येकांच्या मनाला चेतना निर्माण करून देतात.म्हणून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी खूप मोठ्या उत्सवात जयंती साजरी करून माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!