दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला वाव मिळावा म्हणून राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राजमुद्रा फाऊंडेशन व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजूर यांच्या वतीने जी.प.शाळेच्या प्रांगणात शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी ओघवत्या शैलीतील भाषणातून उपस्थितांची मने जिंकली.

राजूर येथे माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.त्या निमित्ताने राजमुद्रा फाऊंडेशनच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.नंतर विद्यार्थ्यांनी गितगायन,वेशभूषा, भाषण यासारख्या कला सादर केल्या.

यावेळी स्पर्धक विद्यार्थ्यांनी माँसाहेब जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद आदी महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.चिमुकल्या वक्त्यांनी आपल्या भाषण शैलीतून उपस्थितांची मने जिंकली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व शालेय साहित्य बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या विजेत्या स्पर्धांकामध्ये अनुक्रमे विजेते विद्यार्थी
शिवानी गजानन बोकाडे,मयूरी दिलीप मगरे,रितिका प्रवीणकुमार शिंदे,समीक्षा मिलिंद मगरे,प्रांजल संतोष पुंगळे, कल्याणी पोटे,सोफियान सादिक,प्रिया हिवराळे, आदी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते समूर्तीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास सरपंच प्रतिभाताई भुजंग,उपसरपंच जिजाबाई मगरे,सदस्या-जिजाबाई करपे,सुनंदा पवार, प्रा,बाळासाहेब बोराडे,भीमाशंकर दारुवाले,राजू मिसाळ, परमेश्वर पुंगळे,विकास पुंगळे,पांडुरंग इंगळे,शालेय समिती अध्यक्ष- संतोष पुंगळे, सदस्य-मिलिंद मगरे,आदींच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले.

या स्पर्धेत गुणलेखक म्हणून श्रीमती सीमा सहाणे व श्रीमती चव्हाण यांनी काम पाहीले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती भिंगोले,सूत्रसंचालन श्रीमती थिटे व आभार एस.के.सहाणे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठ मुख्याध्यापक इ.डी.बाहेकर,शिक्षक-संतोष दारुवाले, श्रीमती जाधव, श्रीमती मुळे,श्रीमती हिंगमीरे,श्रीमती चोबे,श्रीमती सरोदे आदींनी परिश्रम घेतले.
