दर्पण सह्याद्री न्यूज
औरंगाबाद-येथील जेष्ठ पत्रकार दत्ता आगाजी सांगळे (४५) यांचे १६ डिसेंबर शुक्रवार रोजी अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, मुलगा,मुलगी,भाऊ असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सामाजिक,शैक्षणिक,राजकीय व माध्यम क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.दत्ता सांगळे यांनी विविध दैनिकांमध्ये काम करून औरंगाबाद शहरात स्वतःची ओळख निर्माण केली होती.त्यांच्या अंत्ययात्रेस नातेवाईक, मित्रांसह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
