दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे,
श्रीक्षेत्र राजूर
जालना जिल्ह्याचे ग्रामदैवत तथा मराठवाड्यातील प्रसिद्ध गणपती संस्थान श्रीक्षेत्र राजूर येथील राजुरेश्वराच्या दर्शनासाठी अंगारकी चतुर्थी निमित्ताने भाविकांचा मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला.जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून पायी चालत येणाऱ्या भक्तांचे जत्थे अनवाणी पायांनी चालत आल्याचे दिसून आले.या वर्षी नववर्षाच्या स्वागतालाच अंगारकी चतुर्थी आल्याने गणेश भक्तांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरली.नववर्षाच्या संकल्पाबरोबरचआपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी हजारो भक्तांनी श्रीराजुरेश्वराचे दर्शन घेतले.दर्शनाचा प्रथम मान कन्नड तालुक्यातील साखरवेल येथील जनार्धन विठ्ठल निर्मळ व सौ.सीताबाई निर्मळ दाम्पत्यास मिळाला.त्यांचा गणपती संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
ना.दानवे यांनी घेतले श्री राजुरेश्वराचे दर्शन
केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी अंगारकी चतुर्थी निमित्त श्री राजुरेश्वराचे दर्शन घेतले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधून त्यांना हात जोडून अभिवादन केले.
केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या सुविद्य पत्नी सौ.निर्मलाताई दानवे,आमदार नारायण कुचे,आदी मान्यवरांच्या हस्ते महागणपती श्रीराजुरेश्वराची पूजा व महाआरती करण्यात आली.यावेळी गणपती संस्थान विस्वस्थ गणेश मामा साबळे, सुधाकरराव दानवे,सरपंच प्रतिभाताई भुजंग,माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग,उपसरपंच जिजाबाई मगरे,कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे,भगवानराव नागवे,श्रीरामपंच पुंगळे, ग्रामसेवक प्रमोद पुंगळे,’श्री’चे पुजारी मनोज साबळे,ज्ञानेश्वर साबळे,कृष्णा साबळे,ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पुंगळे,राहुल दरख,विनोद डवले,मोहिनीराज मापारी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्रीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी थंडीपासून बचावासाठी गरम कपड्यांचा वापर केला.संस्थांकडून विश्रांतीसाठी हॉल उपलब्ध करून दिला होता. गणपती संस्थांच्या माध्यमातून मंडपची व्यवस्था करण्यात आली होती.’श्री’चे सेवेकरी व स्वयंसेवकांकडून भाविकांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी भाविकांना आरोग्य सेवा पुरवली.आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिक व आपत्कालीन विभागाकडून अग्निशामकदलाची गाडी सज्ज करून ठेवण्यात आली होती.
भाविकांच्या वाहनांमुळे रस्त्यांच्याकडेला दुचाकी व चार चाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. वाहतुकीची कोंडी हाऊ नये म्हणून वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती.भाविकांसाठी एस.टी बस सेवेच्या फेऱ्यात वाढवल्या होत्या.कायदा व सुव्यवस्थासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.थंडीची पर्वा न करता भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शन घेतले.दर्शन झाल्याचे समाधान भक्तांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
जिल्हा प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने अनवाणी पायाने चालत येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेता कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासन सज्ज झाले होते.जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांचे विशेष लक्ष देऊन वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेत होते.उपविभागीय पोलीस अधिकारी,पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.त्यामुळे प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून चौकात- चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
संस्थानकडून फुलांची सजावट व आकर्षक रोषणाई
श्रीराजुरेश्वर गणपती संस्थानकडून मंदिराच्या कळसावर विविध रंगांची उधळण करणारी आकर्षक विद्युत रोषणाई तयार करण्यात आली होती.त्यामुळे मंदिर परिसर अधिकच प्रसन्न वाटत होता.मंदिराचे प्रवेशद्वार फुलमाळांनी सजवले होते.गाभाऱ्यातील मूर्तीस फुलांची आरास तयार केल्यामुळे श्रीराजुरेश्वरांची मुर्ती अधिकच खुलून दिसत होती.
नव वास्तुमुळे दर्शन घेणे झाले अधिक सुलभ
केंद्रीय मंत्री नामदेवराव साहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून गणपती संस्थान विकास कामासाठी कोट्यवधी रुपायांचा निधी उपलब्ध झाला होता.त्यातूनच भव्य दर्शनरांग वास्तू निर्माण झाली.त्यामुळे भक्तांचे दर्शन अधिक सुलभ झाले.या इमारतीमध्ये स्वच्छतागृह,आसन व्यवस्थ, विश्रांतीहॉल,पिण्याचे पाणी यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
विविध संस्थांकडून चहापान व फराळाची व्यवस्था
अंगारकी चतुर्थी निमित्त पायी चालत येणाऱ्या भक्तांसाठी विविध धार्मिक,सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भक्तांना फळे,चहापान व फळांची मोफत व्यवस्था करण्यात आली होती.अनेक भक्तांनी या सेवेचा लाभ घेतला.यावेळी पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
राजुर बसस्थानक बसमय झाले होते
अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची संख्या लक्षात घेता एस.टी महामंडळाने मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या.जालना,औरंगाबाद,भोकरदन, सिल्लोड,देवळगावराजा,जाफ्राराबाद आदी ठिकाणाहून येणाऱ्या बस फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली होती.लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे राजुर बसस्थानक पूर्णपणे बसमय झाले होते.
सेवेकरी,सेवाभावी संस्थाकडून पादत्राण्याची व्यवस्था
राजुर येथील श्रीची सेवेकरी तसेच परिसरातील विविध सामाजिक संस्थांनी भक्ताचे चप्पल,बूट अस्तव्यस्त पडून गहाळ होऊ नये म्हणून चप्पल-बूट स्टँडची व्यवस्था केली होती. त्यामुळे भक्तांना चांगली मदत झाली.दर्शन करू आल्यानंतर सेवेकरींनी त्यांच्या हातात पादत्राणे देताच त्यांना समाधान वाटत असल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली.
