दर्पण सह्याद्री न्यूज
भोकरदन:राजूर पासून जवळ असलेल्या पिंपळगाव सुतार येथील ग्राम पंचायत अंतर्गत विविध विकास कामासाठी दोन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असून केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.यावेळी बदनापूरचे आमदार नारायण कुचे,मुकेशजी पांडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव,जिल्हा परिषद सदस्य गणेश फुके,भगवान तोडावत,संतोष लोखंडे,माजी पंचायत समिती सदस्य सोमीनाथ हराळ,मुकुंदराव मनोहर,सरपंच शारदाबाई मनोहर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे म्हणाले की ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन विकास कामे खेचून आणणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.माजी आमदारांनी २५ वर्षात जे केले नाही ते आम्ही अवघ्या दोन वर्षात करून दाखवले असा टोला ना.दानवें यांनी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यावर लगावला. पिंपळगाव सुतार या गावाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.भविष्यातही विकास कामासाठी निधी कमी पडून देणार नसल्याचे नामदार रावसाहेब पाटील दानवें यांनी सांगितले.

मतदारसंघात गावातील विकास कामाला नेहमीच प्राधान्य दिले आहे.जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असतो याही पुढे विकास कामे केली जातील असे मत आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केले.
तर गेल्या २५ वर्षापासून पिंपळगाव सुतारची ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या ताब्यात होती.त्यादरम्यान ते बारा वर्षे सत्तेत आमदार होते.सत्तेत सहभागी असतांनाही गावकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी २५ वर्षात काहीच केले नसल्याचा आरोप माजी पंचायत समिती सदस्य सोमीनाथ हराळ यांनी केला.विरोधकांनी जे केले नाही ते आम्ही ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वातून १८ महिन्यात पूर्ण करून दाखवले असेही हराळ म्हणाले.

यावेळी पिंपळगाव सुतार येथील ग्रामपंचायत कार्यालय, शाळा खोली,अंगणवाडी बांधकाम, घर तेथे ट्यूबलाईट, नळ कनेक्शन,पळसखेडा दाभाडी ते पिंपळगाव सुतार पाईपलाईन दुरुस्ती,गावातील नदीवर तीन सिमेंट बांधारे, महादेव मंदिरासमोर सभामंडप,जनावरांसाठी पाण्याचा हौद व टाकी या कामाचे लोकार्पण व जलजीवन अंतर्गत नवीन वस्तीत पाणी टाकी बांधकाम,मातोश्री पाणंद रस्ता आदी कामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पिंपळगाव सुतार येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव चिंचोले,राजू आमले , भिका चिंचोले ,आजिनाथ चिंचोले, रंगनाथ चिंचोले ,नामदेव चिंचोले, बालू वनारसे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदार रावसाहेब पाटील दानवे आमदार कुचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी कार्यक्रमासगटविकास अधिकारी सुरडकर, आत्माराम चिंचोले,ग्रामसेविका श्रीमती वाहुळे,मनोज तोडावत,ज्ञानेश्वर पुंगळे,आकाश सर, सुभाष जाधव, विलासराव नावले,विष्णुपंत गाडेकर,ज्ञानेश्वर गाडेकर, श्रीमंत शेजुळ, काकासाहेब शेजुळ, योगेश अंभोरे, शिवाजीराव खरात, केशवरावखरात,विठ्ठलराव चिंचोले, हरिदास दानवे,रमेशराव चिंचोले,सोनाजी चिंचोले,गणेश चिंचोले,पाराजी चिंचोले,नारायण चिंचोले,विष्णू आम्ले, संदीप आम्ले,आत्माराम वनारसे,यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
