दर्पण सह्याद्री न्यूज
जलजीवन अभियान:श्रीक्षेत्र राजूर येथे पाणीपुरवठा योजनाचे भूमिपूजन
श्रीक्षेत्र राजूर:राज्यात आजही अनेक गावात लोकांना पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करावी लागते.अशुद्ध पाणी पिल्याने अनेक आजार जडतात.त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन उपचारासाठी बराच खर्चही करावा लागतो.यातून सर्वसामान्य माणसांची सुटका व्हावी म्हणून २०२४पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकांना शुद्ध पाणी मिळावे हे देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींजींचे स्वप्न आहे.या संकल्पनेतून हर घर जल योजनेंतर्गत भविष्यात प्रतिदिन एका व्यक्तीला ५५ लिटर पाणी मिळणार असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.राजूर येथे जलजीवन अभियानांतर्गत बाणेगाव ते राजूर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन ना.दानवेंच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.निर्मलाताई दानवे आ.संतोष पाटील दानवे,आ.नारायण कुचे,कार्यकारी अभियंता श्री रबडे’भाजपा जेष्ट नेते शिवाजीराव थोटे, सुधाकरराव दानवे,सरपंच भाऊसाहेब भुजंग,उपसरपंच विनोद डवले,ग्राम पंचायत सदस्य मुसा सेठ सौदागर, माजी जि.प.सदस्य रामेश्वर सोनुने,ग्राम पंचायत सदस्य राहुल दरख,आप्पासाहेब पुंगळे, विष्णू राज्यकर,माजी सरपंच शिवाजीराव पुंगळे,सहकार बोर्ड अध्यक्ष बाबुराव खरात , माजी सभापती गजानन नागवे, रामलाल चव्हाण,गणेश मामा साबळे,तंटामुक्ती अध्यक्ष श्रीरामपंच पुंगळे, संतोष मगरे,भगवानराव नागवे,व्यापारी संघटना अध्यक्ष राम पारवे,जेष्ठ पत्रकार श्यामराव पुंगळे, शिवाजी बोर्डे,संजय पुंगळे,दीपक पारवे,जगन्नाथ थोटे,मेस्टा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, बाळू मापारी,रतन शेठ ठोंबरे मधुकरराव तांबडे, पंढरीनाथ करपे,बबन मगरे,आशाताई माळी,शोभाताई मतकर,योगिताताई दानवे,लक्ष्मीबाई खरात,प्रतिभाताई भुजंग,ग्राम पंचायत सदस्या जिजाबाई मगरे,सुशिलाबाई भुजंग,संगीताताई पुंगळे, अनिताताई पुंगळे,रामबाई जगताप,ताईबाई मगरे,लहानुबाई मगरे,चंद्रकलाबाई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.दानवें म्हणाले की ग्रामीण भागात प्रत्येकाला आपल्या घराजवळ शुद्ध पाणी मिळाले पाहिजे हे हर घर जल योजनेचे उद्दिष्ट आहे.या दृष्टीने जलजीवन अभियानाची अंमलबजावणी चालू आहे.राजूर हे आता गाव राहिले नसून ते एक नवीन शहर म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे पुढील पंचवीस वर्षाचा विचार करूनच योजना निर्माण केल्या जात आहेत.राजूरसाठी पाणीपुरवठा योजना व जलकुंभाची मागणी बऱ्याच दिवसांपासून होती ती आज पूर्ण होत आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही ४८ लक्ष रुपये निधी खर्चून बाणेगाव येथील प्रकल्पातून राजूरकरांसाठी पाणीपुरवठा योजना आणली आहे.राजुर हे तीर्थक्षेत्र आणि बाजारपेठ विकासाचे प्रमुख केंद्र बनत असून पुढील काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल.जलजीवन अभियान अंतर्गत सर्वात जास्त निधी भोकरदन तालुक्यात आणला असून भविष्यात श्रीक्षेत्र राजुरसाठी अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करणार असे ना.दानवे यांनी सांगितले. यावेळी ना.दानवे यांच्या हस्ते राजूर ग्राम पंचायतने मागील पाच वर्षांच्या काळात केलेल्या विकास कामाची पावती म्हणून पंचवार्षिक प्रगती कार्य अहवाल या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
विविध विकासाभिमुख योजनांचे भूमिपूजन व लोकार्पण-

केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील यांच्या हस्ते राजूर ग्राम संसद कार्यालयाअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यामध्ये जलजीवन अभियानांतर्गत राजूर शहरासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.स्थानिक विकास निधीतून मस्जिद रोड सिमेंट रस्ता व भूमिगत नाली बांधकामासाठी १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर,ग्रामपंचायत माध्यमातून पंधराव्या वित्त आयोग योजनेतून जलशुद्धीकरण केंद्राचा शुभारंभ, तसेच आमदार स्थानिक विकास निधीतून ११ लक्ष रुपये सिमेंट रस्त्यासाठी मंजूर,जिल्हा परिषद शाळेसाठी सोलर प्लॅन्टचे उद्घाटन यासारख्या अनेक विकास कामाचा शुभारंभ ना.दानवें यांच्या हस्ते करण्यात आला.
पायाभूत सुविधा निर्माण करणार-आ.संतोष दानवे

राजुर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे भाविकांची नेहमीच वर्दळ असते.जलजीवन अभियानाच्या माध्यमातून राजूरकरांचा पाहण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.राजूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.वीज, पाणी,रस्ते,आरोग्य आणि शिक्षण या माध्यमातून नागरिकांस पायाभूत सुविधा निर्माण करून देणार असल्याचे प्रतिपादन आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले.८३ गावांमध्ये शंभर कोटीहुन अधिक निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले ‘हर घर जल’आणि ‘हर घर बिजली’ या योजनेअंतर्गत भोकरदन-जाफ्राबाद या दोन तालुक्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाआहे. राजूर येथील बाजारपेठ नव्याने उदयास येत असून व्यवसाय,दळणवळण आणि रोजगार निर्मितीस मदत होत आहे. श्रावण बाळ,विधवा माता आणि दिव्यांग यांच्यासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे मत आमदार संतोष दानवे यांनी व्यक्त केले.
शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचविणार- आ.कुचे

श्रीक्षेत्र राजुर हे मराठवाड्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात.त्यामुळे पुढील तीस वर्षांचे नियोजन करून ग्रामपंचायत माध्यमातून प्रत्येक समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचविणार असल्याचे मत आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केले.पुढे बोलताना आ.कुचे म्हणाले की आम्ही केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या विचारांचे पाईक आहोत.ना.दानवेंच्या दूरदृष्टीपणामुळे मतदारसंघाचा विकास झाला आहे.आरोग्य,शिक्षण, वीज, पाणी,रस्ते यासारखे प्रश्न मार्गी लागत आहेत.सर्व रस्ते श्रीक्षेत्र राजूरला जोडल्यामुळे दळणवळणास गती मिळत आहे. महाराष्ट्रात कुठल्याच ग्रामपंचायतीला मिळाला नाही इतका निधी राजूर ग्रामपंचायतीला प्राप्त झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचत असल्याचे मत आ. कुचे यांनी व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री ना.दानवेंच्या माध्यमातून राजुरचा सर्वांगीण विकास-सरपंच,भाऊसाहेब भुजंग

केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे खंबीर नेतृत्व आणि विकासात्मक दूरदृष्टी,आ.संतोष दानवे,आ.नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनातुन राजूर नगरीचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली असल्याचे मत सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी व्यक्त केले. ना.दानवें यांच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षात विविध विकासकामे खेचून आणली आहेत.पाणी पुरवठा योजना,गावअंतर्गत सिमेंट रस्ते,नवीन वस्तीत विद्युत जोडणी,घरोघरी नळ कनेक्शन,आरोग्य सुविधा, शिक्षण,मागासवर्गीय समाजासाठी स्मशानभूमी, जलशुद्धीकरण केंद्र यासारख्या विविध विकास योजना राबविल्या आहेत असे मत सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास या कार्यक्रमास सरपंच सुदाम ढवळे, साहेबराव ठोंबरे,राजू पाटील होलगे,मुन्ना शेठ शेखावत रावसाहेब ढवळे,अशोक ढवळे,सिन्नस ढवळे,विठ्ठल शेठ इंगेवार,मिटकरी साहेब ,जगन्नाथ थोटे, कौतिकराव लहाने, कृष्णा ढवळे,सुदाम पिंपळे,दत्ता भूमकर ,नवनाथ फुके, देवराव जगताप,किशोर कढवणे,रामेश्वर पाटील नागवे, गजानन साखरे,मनोहर घायाळ,माधवराव नागवे, कैलास टोम्पे,बालाजी जगताप,पिंपळे बापू,जगन ठोंबरे,संतुकराव ठोंबरे,अशोक गायके,उत्तम रेवगुडे,गणेश पुंगळे,भगवान सुद्रीक,सोमीनाथ पुंगळे यासह अनेक जण उपस्थित होते.
