रेल्वे महामार्गामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना;
केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवेंचा शाश्वत ग्राम विकासावर भर
प्रा.बाळासाहेब बोराडे
जालना:केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा रेल्वे विकासाला अधिक बळ मिळाले आहे.रेल्वे प्रशासनाने कृतीयुक्त आराखडा तयार करून मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकार गती देण्याचे कार्य करत आहे. भविष्यात ही योजना अधिक गतिमान झाल्यास त्यातून ग्राम विकासाला चालना मिळेल.यातूनच मराठवाड्याचे मागासलेपण दूर होण्यास मदत होईल.रेल्वे विकासाचे जाळे सर्वदूर पसरले तर मराठवाडा रेल्वे हब म्हणून ओळखला जाईल.असा केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा मानस आहे.

मराठवाड्याचे मागासलेपण दूर करायचे असेल तर नवीन सोर्स निर्माण करावे लागतील याची ना.दानवेंना जाणीव आहे. मराठवाड्यातील जनतेने केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेती पूरक व्यवसाय निर्माण करून स्वालंबी बनणे हे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यात रेल्वे जाळे निर्माण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे.
मराठवाड्याच्या विकासास पूरक वातावरण तयार करावयाचे असेल तर रेल्वे लाईनला मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर एकमेकांना जोडली गेली पाहिजे.छत्रपती संभाजीनगर हे आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर आहे. शहराला ऐतिहासिक व जागतिक वारसा लाभला आहे. येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत जगप्रसिद्ध आहे.तसेच जालना शहर सीड्स हब म्हणून जगप्रसिद्ध आहे.स्टील उत्पादन जालन्याचा आशिया खंडात दबदबा आहे.परभणी हे रेल्वे स्थानकाचे मुख्य ठिकाण असून कृषी क्रांतीचे शहर म्हणून ओळखले जाते.लातूर शहर शिक्षणाचे माहेरघर असून बीडमधील परळी वैजिनाथ हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.नांदेड हे शहर रेल्वेच्या माध्यमातून देशातील प्रमुख शहरांना जोडले गेले असून शीख बांधवांचे पवित्र असे धार्मिक ठिकाण आहे.
छत्रपती संभाजीनगर ,जालना,परभणी,नांदेड,लातूर,बीड, परळी,धाराशिव, हिंगोली ही शहरे रेल्वेच्या दृष्टीने एकमेकास जोडली गेली की यातून दळणवळणाच्या सोयी निर्माण होऊन व्यापार उद्योगास चालना मिळेल व विकासाला हातभार लागेल.अशा व्यापक उद्देशातून केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी रेल्वेचे नेटवर्कच्या सहाय्याने मराठवाड्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मराठवाड्यातील रेल्वे मार्गाचा विकास झाल्यास यामुळे स्थानिक व्यापारसह दळणवळण,कृषी ,पर्यटन, उद्योग, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येईल.रोजगार निर्मितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहास जोडला जाईल . यातूनच मराठवाड्याचे मागासलेपण दूर होण्यास मदत होईल.
