दर्पण सह्याद्री न्यूज:

जालना:तालुक्यातील पारेगांव,पारेगाव तांडा,पारेगाव वाडी, जैतापूर,मानेगाव,बाजी उंब्रद यासह अनेक ठिकाणी काल रात्री अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. जालना तालुक्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पहाणी केली व सबंधित अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यचे आदेश दिले.

 

जालना तालुक्यातील अनेक गावांच्या शिवारात अचानक चक्रीवादळासह मुसळधार पाऊस पडल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन,कपाशी,तूर तसेच मिरची,भेंडी, टोमॅटो यासारख्या अनेक सिड्स पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे डाळिंब,द्राक्ष, आणि मोसंबी फळबागांनाही मोठा फटका बसला आहे.चक्रीवादळ आल्याने शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊस व शेडनेटचेही नुकसान झाले आहे. खरिपाची काढणीला आलेली पिकं वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे होतातोंडाशी आलेला घास हातातुन जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे कळताच आमदार कैलास गोरंट्याल यांनी तात्काळ नुकसान झालेल्या भागांची पहाणी केली व सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी तहसील मंडळाधिकारी कळकुंबे,कृषी सहायक श्रीमती खरात, नितीन कानडे,मानेगावचे सरपंच संतोष ढेंगळे,श्रीराम पोटरे,हरीभाऊ राठोड, बाबासाहेब शेजुळ, माजी सरपंच छबुराव राठोड,उत्तमराव राठोड,सुभाष राठोड,शेख संदल,संतोष जाधव, रामधन राठोड,श्याम पवार,बाबासाहेब गायकवाड, कारभारी गायकवाड, विलास शेजुळ, विजय शेजुळ,गणेश पवार, सावजी राठोड,अंजू भाऊ चव्हाण,अंकुश चव्हाण,अरुण घडलीगं, योगेश पाटील. बबन राठोड,संतोष जाधव,पारेगाव  ग्रामपंचायत सदस्य नितीन कानडे यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!