दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर :भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा ‘या अभियानांतर्गत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून भोकरदन तालुक्यातील व चांधई एक्को केंद्रातील सिद्धार्थनगर जि.प. प्राथमिक शाळेत एकशे एक वृक्षांची लागवड करून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी भोकरदनचे गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर,पाराशर शिक्षक पतसंस्थेचे चेरमन संतोषराव इंगळे.गट समन्वयक एस.बी.नेव्हार पंचायत समितीचे माजी सदस्य जगनराव पवार,सामाजिक कार्यकर्ते प्रा.बाळासाहेब बोराडे बांधकाम व्यावसायिक भीमाशंकर आप्पा दारूवाले,डायनामीक स्कूलचे सचिव गणेश खरात,चांदाई एक्को केंद्रप्रमुखअण्णा इंगळे,रमेश पुंगळे,राजू निहाळ मुख्याध्यापक प्रल्हाद पालोदे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी शहगडकर यांनी वृक्षारोपण बरोबरच वृक्षसंवर्धन किती महत्वाचे आहे हे पटवून दिले तर वृक्ष ऊन,वारा, पाऊस झेलत वृक्ष इतरांना सावली देतात. वृक्षांमध्ये त्याग व परोपकारी भावना असल्याचे मत प्रा.बोराडे यांनी सांगितले. तर भावी पिढीला सुखी ठेवायचे असेल तर वृक्षारोपण व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत संतोष इंगळे यांनी व्यक्त केले.
बांधकाम व्यावसायिक भीमाशंकर दारुवाले यांनी वृक्ष लागवडीसाठी कलमा उपलब्ध करून दिल्या बद्दल गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सलग अठ्ठावीस वेळा रक्तदान करणारे शिक्षक विनोद कुमार पांडे व रक्तदाते आशिष डोंगरे यांचाही सत्कार करण्यात आला.
सरपंच काकासाहेब शेजुळ, उपसरपंच श्रीमंत पाटील शेजुळ,विनोद पांडे,आजिनाथ इंगळे,विष्णू बिरादार, शालिकराम काकडे, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब वैद्य,विष्णू गवळी,नामदेव रजाळे,दीपक जावळे,भिमराव सदाशिवे, गजानन लहाने,श्रीकांत आगमे,माधव गंधपवाड , आशिष डोंगरे,ज्ञानेश्वर गायके,रामेश्वर चंदनकर,सचिन अक्कर ,संजय बेदमुथा,आण्णा गटकाळ,भगवान ढाकणे, विजय साळवे,संदीप पवार,शिवकुमार कांबळे तसेच ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.एच.दानवें सूत्रसंचालन अभिजित बंगाळे तर आभार प्रदर्शन सचिन अक्कर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर.एच.दानवे व श्रीमती डी.एस.चिटकलवार यांनी परिश्रम घेतले.
