दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर
वृक्षांमध्ये त्याग व परोपकारी भावना असते.ऊन,वारा, पाऊस झेलत ते इतरांना सावली देतात.भावी पिढीला सुखी ठेवायचे असेल तर वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे.ही बाब लक्षात घेऊन भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पाचीपार दत्त मंदिर परिसरात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते विविध झाडांच्या कलमांचे वृक्षारोपण आणि स्वयंपाकगृहाचे उद्घाटन करण्यात आले.
सर्वप्रथम दत्त मंदिर संस्थांचे पुजारी गणेश देवा,गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुधाकरराव दानवे यांच्या हस्ते स्वयंपाकगृहाचे श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.यावेळी भगवान नागवे,आप्पासाहेब साखरे,सुखानंद पारवे,प्रा.बाळासाहेब बोराडे,भीमाशंकर दारुवाले,पंढरीनाथ करपे,गणेश खरात, कैलास गबाळे,शिवाजी रेगुडे,अण्णा ढाकणे,आदी मान्यवरांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी दत्त मंदिर संस्थांच्या वतीने मान्यवरांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी सुधाकरराव दानवे, सुखानंद पारवे, पंढरीनाथ करपे,आप्पासाहेब साखरे आदी मान्यवरांनी मंदिर बांधकामासाठी लागणारे सिमेंट,विटा,वाळू,लोखंड व इतर साहित्य देण्याचे आश्वासन दिले.तर भीमाशंकर दारुवाले यांनी सिमेंट,वृक्षांच्या कलमा,ट्री गार्ड,व जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले होते.यावेळी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.दत्त मंदिर संस्थांचे पुजारी गणेश देवा यांनी संस्थानला विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे संस्थानच्या वतीने आभार मानले.संस्थांच्या वतीने उपस्थितांची चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमास दीपक घुगे, पांडुरंग इंगळे,गणेश पडोळ,सुभाष लिंगायत, संभाजी ढाकणे,दीपक ढाकणे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
