दर्पण सह्याद्री न्यूज:

भोकरदन: तालुक्यातील हसनाबाद येथील जीईएस इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून लक्ष्मण मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच ऑलिम्पियाड आणि अंबिकस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यय साधून’एक पेड़ माँ के नाम’या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आणि पालकांना बेल वृक्षांची रोपे वाटप करण्यात आली.विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली शहरांमधून काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी,सुभाष बाबू,राणी लक्ष्मीबाई,लोकमान्य टिळक,भारत माता यांच्या वेशभूषा केल्या होत्या.विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतावर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी भाषणांच्या माध्यमातून आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या कार्यावर प्रकाश टाकला.आदित्य घोडके, गौरव इंगळे, या विद्यार्थ्यांनी इंग्रजीत सूत्रसंचलन केले.ड्रिल मार्च विद्यार्थी प्रतिनिधी श्रुती पुंगळे हिच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!