दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर:येथून जवळ असलेल्या श्री. विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

या परीक्षेत ऋषिकेश सदाशिव दिडहाते याने ९१% टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर जागृती ज्ञानदेव ढाकणे व आकांक्षा विलास खराडे या विद्यार्थिनींनी समान गुण घेऊन म्हणजेच ९०.८०% गुण प्राप्त करून द्वितीय येण्याचा मान मिळवला.तर शीतल बालाजी निहाळ या विद्यार्थिनी ९०.४०% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक,पालक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!