दर्पण सह्याद्री न्यूज
अंबड तालुक्यातील पराडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री मा.ना.रावसाहेब पाटील दानवे,आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर केला आहे.
यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते छत्रभुज मालोदे,पुंजाराम नाटकर,अमोल मकासरे,भास्कर रणदिवे, समाधान रणदिवे,संदीप मकासरे,सय्यद साजेद यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते शाल,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.पुढील काळात भारतीय जनता पक्षाचे ध्येयधोरण सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पालकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ.नंदकिशोर पिंगळे,भाऊसाहेब अडसूळ, सय्यद आवाज भाई,जाकेर भाई,पांडुरंग नाटकर यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
