दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर-भोकरदन तालुक्यातील राजुर येथे ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसंसद कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सरपंच भाऊसाहेब भुजंग,सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक बाळासाहेब बोराडे,डॉक्टर सुदर्शन थोटे यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपसरपंच विनोद डवले,गणपती संस्थांचे पुजारी गणेश मामा साबळे,भगवानराव नागवे,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष-राम पारवे,ग्रामसेवक प्रमोद पुंगळे,ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पुंगळे,निवृत्ती पुंगळे,संतोष मगरे, राज्येकर नाना,प्रसिद्ध व्यवसायिक रतन ठोंबरे,नारायण डकले,निलेश जामदार,दारुवाले सर आदी मान्यवरांच्या हस्तेही प्रतिमा पूजन करण्यात आले.

सुरुवातीस सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी प्रास्ताविकातून ग्रामपंचायतच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या अंत्योदय व इतर योजनांची माहिती देऊन या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून केले जात असल्याचा मत त्यांनी प्रस्ताविकेतून व्यक्त केले.
तर प्रा.बाळासाहेब बोराडे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.पंडित दीनदयाल उपाध्याय हे प्रखर देशभक्त,उत्तम संघटक व अंत्योदयचे प्रणेते होते. समाजातील शोषित, दलित,पीडित लोकंपर्यंत विकासाची गंगा जावी असा त्यांचा मानस होता.विचारांशी तडजोड न करता समाज आणि राष्ट्रहितासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केल्याचे मत प्रा.बोराडे मत यांनी व्यक्त केले.

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून म्हणजेच सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या कालावधीमध्ये सेवा पंधरवडानिमित्त रक्तदान,वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे,शालेय साहित्य वाटप यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये परिसरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी केले.

या कार्यक्रमास सरपंच भाऊसाहेब भुजंग,उपसरपंच विनोद डवले,भगवानराव नागवे, गणपती संस्थान पुजारी गणेश साबळे, प्रा.बाळासाहेब बोराडे,डॉ. सुदर्शन थोटे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राम पारवे,प्रसिद्ध व्यवसायिक रतन ठोंबरे,ग्रामसेवक प्रमोद पुंगळे,ग्रामपंचायत सदस्य संतोष मगरे,आप्पासाहेब पुंगळे,निवृत्ती पुंगळे,संतोष मगरे, निलेश जामदार, दारुवाले सर,गणेश पुंगळे,भगवान सुद्रिक गजानन डवले, विजय पुंगळे, सोमीनाथ पुंगळे,यासह अनेकजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!